आषाढी यात्रेत तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या 6 वारकऱ्याना मिळाले जीवनदान ; उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांची माहिती
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांची माहिती
आषाढी यात्रेत तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या 6 वारकऱ्याना मिळाले जीवनदान ;
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांची माहिती
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय वारकऱ्यांना दिले उपचार
पंढरपूर - आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरात श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारची आरोग्य सेवा देण्यात आली. यामध्ये तीव्र हृदयविकाराच्या झटका आलेल्या 6 वारकऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे तात्काळ उपचार देण्यात आल्याने त्यांचे जीव वाचविण्यात यश आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांनी दिली.
उपचारामध्ये श्री. दिगंबर जाधव, वय ६०, रा. हदगांव, जिल्हा नांदेड, पार्वती गोडगे रा. मालेगाव जिल्हा सोलापूर,)कमलाबाई बुगडे वय 60 रा. मोहगाव, जिल्हा -वर्धा, भैरूनाथ असकुले वय 34,रा कळंब जिल्हा धाराशिव, छबूताई अकोलकर वय 73 रा. अकोला, महेश कदम वय 51रा. तुळजापूर या वारकरी भाविकांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने सदरील रुग्ण तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे दाखल करण्यात आले होते.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. श्री. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे, आयसीयू नोडल अधिकारी डॉ. महेश कुमार सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ. सीमा इंगोले यांनी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या 6 रुग्णाचा इसीजी काढून तातडीने रुग्ण आयसीयू मध्ये दाखल केले व त्यांना थ्रोम्बोलायसिस करण्यात आले.सदरील 6 रुग्णांना वेळेत थ्रोम्बोलायसिस उपचार देण्यात आले. या उपचारामुळे रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यात मदत झाली आणि रुग्णांची स्थिती स्थिर करण्यात आली. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय उपचार व सतत देखरेखीखाली रुग्णाची प्रकृती सुधारली. सध्या संबंधित वारकरी भाविकाची प्रकृती चांगली असून त्यांना पुढील योग्य त्या उपचारासाठी संदर्भित केले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे यांनी दिली.