सीना-माढा योजनेच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील आमदार अभिजीत पाटील यांचे पाठपुराव्याला यश
२१ वर्षे जुन्या यंत्रणेच्या दुरुस्ती-नूतनीकरणाला नियामक मंडळाची मंजुरी
सीना-माढा योजनेच्या नूतनीकरणाला हिरवा कंदील आमदार अभिजीत पाटील यांचे पाठपुराव्याला यश
(२१ वर्षे जुन्या यंत्रणेच्या दुरुस्ती-नूतनीकरणाला नियामक मंडळाची मंजुरी)
पंढरपूर - माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेतील तब्बल २१ वर्षे जुनी यंत्रणा बदलण्यासह सर्व मोटारी बदलण्यात येणार असून सुमारे ६ किलोमीटर लांबीची मेन रायझिंग पाइपलाइनही नव्याने टाकण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अपुऱ्या व अनियमित पाण्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचे सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
आज मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीस माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील उपस्थित होते. या बैठकीत सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत सविस्तर चर्चा होऊन जुन्या यंत्रणेच्या पुनर्बांधणीस मंजुरी देण्यात आली.

सीना-माढा उपसा सिंचन योजना गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आली आहे. मात्र, योजनेतील यंत्रणा जुनी झाल्याने मोटारी, पंपिंग व्यवस्था आणि पाइपलाइनच्या क्षमतेवर परिणाम होत होता. परिणामी अपेक्षित क्षमतेने पाणी उपसा करून ते शेतीपर्यंत पोहोचवताना अडचणी निर्माण होत होत्या.
या पार्श्वभूमीवर सर्व मोटारी बदलणे, पंपिंग यंत्रणा सक्षम करणे आणि सुमारे ६ किलोमीटरची मेन रायझिंग पाइपलाइन नव्याने उभारणे, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या यंत्रणेचे नूतनीकरण झाल्यानंतर योजनेची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीना-माढा सिंचन योजनेच्या प्रश्नासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी गेल्या काही काळापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. योजनेची सद्यस्थिती, जुन्या मोटारी व पाइपलाइनमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योजनेची यंत्रणा सक्षम होणे अत्यावश्यक असल्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत नियामक मंडळाने दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. सीना-माढा योजनेतील मोटारी व मुख्य पाइपलाइन बदलण्याच्या निर्णयामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. योजनेची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास अनेक गावांतील शेतीला त्याचा थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाला गती कधी मिळणार आणि सुधारित यंत्रणेतून शेतकऱ्यांना नियमित पाणी कधी मिळणार, याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.

सीना-माढा योजनेतील मोटारी व मुख्य पाइपलाइन बदलण्याच्या निर्णयामुळे माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. योजनेची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास अनेक गावांतील शेतीला त्याचा थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाला गती कधी मिळणार आणि सुधारित यंत्रणेतून शेतकऱ्यांना नियमित पाणी कधी मिळणार, याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. या निर्णयासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, श्री. हेमंतजी धुमाळ, श्री. चोपडे, श्री. एस.सी. खांडेकर तसेच या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
चौकट -
पाणी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळाले की शेती फुलते आणि शेती फुलली की माढ्याचा विकास अधिक वेगाने होईल त्यामुळे सीना-माढा योजनेच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचा हा निर्णय केवळ यंत्रणा बदलण्यापुरता मर्यादित नसून माढ्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. माढ्याच्या मातीतील प्रत्येक शेतकरी सुखी आणि समृद्ध व्हावा, हीच आपली मनापासूनची इच्छा असून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठीचा लढा यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सर्व अधिकाऱ्यांचे आभार.
आ.अभिजीत आबा पाटील
माढा विधानसभा मतदारसंघ