स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान;

जवळपास दीड टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान;
स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान;

पंढरपूर - स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस ) विभागाच्या वतीने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ए बी व्ही पी ), पंढरपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर परिसर तसेच चंद्रभागा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सुमारे स्वेरीच्या १५० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्वयंसेवकांनी विठ्ठल मंदिर परिसर, नामदेव पायरी ते चंद्रभागा नदी परिसरातील प्लास्टिक, निर्माल्य व इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ केला. या अभियानात सुमारे दीड टन कचरा संकलित करण्यात आला असून त्याची पंढरपूर नगरपरिषदेच्या सहकार्याने योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी भाविकांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसर राखण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या स्वच्छता अभियानात  नगराध्यक्षा सौ. प्रणिता भालके,प्रणव परिचारक, तसेच नगरपरिषदेचे मान्यवर नगरसेवक यांनी प्रत्यक्ष सहभागी होत स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिले. हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार तसेच उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनीही या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वयंसेवकांचे मनोबल वाढविले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल चौंडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूर जिल्ह्याचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

उपस्थित मान्यवरांनी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक पंढरपूर घडविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.या विठ्ठल मंदिर परिसर व चंद्रभागा नदीकाठी भव्य स्वच्छता अभियान; दीड टन कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली.या अभियानाचे नागरिक व भाविकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत करून स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले.