आषाढी वारी 2026 : पंढरपूर शहर व पालखी मुक्कामस्थळी मद्यविक्री व ताडी दुकाने बंद

आषाढी वारी 2026 : पंढरपूर शहर व पालखी मुक्कामस्थळी मद्यविक्री व ताडी दुकाने बंद

आषाढी वारी 2026 : पंढरपूर शहर व पालखी मुक्कामस्थळी मद्यविक्री व ताडी दुकाने बंद

सोलापूर :-  आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, मधील कलम 142 अन्वये आदेश जारी केला असून, या आदेशानुसार दि. 23 जुलै ते 27 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूर शहर तसेच शहरापासून 5 किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील. तसेच दि. 28 व 29 जुलै 2026 रोजी पंढरपूर शहर व 5 किलोमीटर परिसरातील सर्व मद्यविक्री व ताडी दुकाने सायंकाळी 5 वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत.

या शिवाय संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामस्थळीही सार्वजनिक शांतता राखण्यासाठी संबंधित गावांमध्ये पुढीलप्रमाणे मद्यविक्री व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद राहतील :
दि. 18 व 19 जुलै : नातेपुते पुर्ण दिवस बंद .दि. 19 व 20 जुलै : माळशिरस, अकलूज पुर्ण दिवस बंद .दि. 20 व 21 जुलै : वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर पुर्ण दिवस बंद .दि. 21 व 22 जुलै : भंडीशेगाव, पिराची कुरोली पुर्ण दिवस बंद.दि. 22 व 23 जुलै : वाखरी (ता. पंढरपूर)  पुर्ण दिवस बंद .

संबंधित आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.