मोहोळच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा ;

आ.राजू खरे यांच्या मागणीची महसूलमंत्र्यांकडून दखल

मोहोळच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा ;

मोहोळच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा ;

आ.राजू खरे यांच्या मागणीची महसूलमंत्र्यांकडून दखल

मोहोळ : मोहोळ विधानसभा मतदारसंघात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत महसूलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्दे श दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आमदार राजू खरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जून ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मोहोळ मतदारसंघात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी मदत देण्यासाठी मोहोळ तहसीलदारांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या माध्यमातून शासनाकडे निधी मंजुरीचा प्रस्ताव पाठविला आहे.

शासनाने दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली असली, तरी दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता, काही तांत्रिक अडचणींमुळे अनुदान पोर्टलवर संबंधित माहिती प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही

नुकसानभरपाई वितरित करण्याचे निर्देश

या निवेदनावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) यांना प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करून नुकसानभरपाई वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मोहोळ मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू खरे यांनी महसूलमंत्र्यांकडे केली.