फॅबटेकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील सहा विद्यार्थ्यांची "अलदा सोल्युशन" कंपनीत निवड
फॅबटेकच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मधील सहा विद्यार्थ्यांची "अलदा सोल्युशन" कंपनीत निवड
सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ६ विद्यार्थ्यांची नामांकित "अलदा सोल्युशन" या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
"आलदा सोल्युशन" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये हिना बावशे, प्रविण फराटे, संजय लिगाडे, मयुरी होवाळ, वैष्णवी माने आणि प्रणाली कांबळे आदी ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या, तांत्रिक ज्ञानाच्या आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली.

"अलदा सोल्युशन" ही स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील आधुनिक आणि विश्वासार्ह कंपनी असून, २०१९ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची समान आवड असलेल्या अभियंत्यांनी तिची स्थापना केली. ग्राहकांशी दीर्घकालीन भागीदारी निर्माण करून केवळ प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करणे, ही कंपनीची कार्यपद्धती आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण सेवा आणि उत्कृष्ट टीम वर्कच्या बळावर कंपनीने अल्पावधीतच विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
'आलदा सोल्युशन' कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विशाल भाकरे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.