समाजहिताच्या प्रश्नांसाठी 'भैरवनाथ'ची कायम मदत - अनिल सावंत 

भाळवणी येथे मेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

समाजहिताच्या प्रश्नांसाठी 'भैरवनाथ'ची कायम मदत - अनिल सावंत 

समाजहिताच्या प्रश्नांसाठी 'भैरवनाथ'ची कायम मदत - अनिल सावंत 

भाळवणी येथे मेंबर चषक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण

मंगळवेढा -  भैरवनाथ परिवाराने साखर कारखानदारी याबरोबरच तालुक्यातील विविध समाजहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने योगदान दिले आहे. भविष्यातही ही भूमिका कायम राहील, असे प्रतिपादन भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.

तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित मेंबर चषक क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंधवे, जमीर इनामदार, पांडुरंग चौगुले, सरपंच लक्ष्मण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सीताराम भगरे, चंद्रकांत मोरे, शिवाजी दोडके, चारुदत्त पाटील, महादेव शिंदे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे आदी उपस्थित होते.

सावंत म्हणाले, दुष्काळी भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरातील अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न कारखान्यामुळे मार्गी लागला आहे. जलसंधारण, पारंपरिक खेळ आणि विविध सामाजिक उपक्रमांनाही भैरवनाथ परिवाराने नेहमीच पाठबळ दिले आहे. तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेत कामसिद्ध क्रिकेट क्लब, खोमनाळ यांनी प्रथम, मेंबर इलेव्हन क्रिकेट क्लब, भाळवणी यांनी द्वितीय, माळवाडी क्रिकेट क्लब यांनी तृतीय तर शिवछत्रपती क्रिकेट क्लब यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना ट्रॉफी, रोख रक्कम व अन्य बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी भागवत वाडेकर, शंकर भगरे, ऋषीकेश इरकर, स्वप्नील शिंदे, गणेश कदम, दया माने, सिद्धेश्वर गायकवाड, सागर गिड्डे आणि ओंकार वाडेकर यांनी परिश्रम घेतले.