फॅबटेक मेकॅनिकल मधील संकेत लेंडवे यांची 'स्टेलेक्स इक्विपमेंट प्रा. लि.' कंपनीत निवड

फॅबटेक मेकॅनिकल मधील संकेत लेंडवे यांची 'स्टेलेक्स इक्विपमेंट प्रा. लि.' कंपनीत निवड

सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी संकेत राजेंद्र लेंडवे यांची स्टेलेक्स इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित औद्योगिक कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य रविंद्र शेंडगे यांनी दिली.
   
"स्टेलेक्स इक्विपमेंट प्रा. लि." ही औद्योगिक उपकरणे, मटेरियल हँडलिंग सिस्टीम, विशेष अभियांत्रिकी यंत्रसामग्री, फॅब्रिकेशन, उत्पादन प्रक्रिया आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली विश्वासार्ह कंपनी आहे. उद्योगांच्या गरजेनुसार उच्च दर्जाची यंत्रसामग्री, अभियांत्रिकी उपाय आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन देण्यासाठी कंपनी ओळखली जाते. आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित कार्यपद्धती आणि गुणवत्तेवर भर देणारी ही कंपनी तरुण अभियंत्यांना कौशल्य विकसित करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देते. अशा या कंपनीत फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील संकेत राजेंद्र लेंडवे यांची निवड झाली आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना संकल्पनांवर मजबूत पकड, तांत्रिक कौशल्य आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर संकेत लेंडवे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे विभागातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.

या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, प्राचार्य रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहूल औताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.