एस के एन सिंहगड कोर्टी पंढरपूर -राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ‘नमामि चंद्रभागा’ स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

एस के एन सिंहगड कोर्टी पंढरपूर -राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ‘नमामि चंद्रभागा’ स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

एस के एन सिंहगड कोर्टी पंढरपूर -राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ‘नमामि चंद्रभागा’ स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

पंढरपूर - एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नमामि चंद्रभागा’ स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता नामदेव पायरी व पुंडलिक पायरी परिसरात आयोजित करण्यात आला.

या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करत प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित केला. नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत समाजामध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्वयंसेवकांनी ‘स्वच्छ नदी – सुंदर पर्यावरण’ हा संदेश देत नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

या स्वच्छता अभियानात पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पंढरपूर तालुका संयोजक श्रद्धा बाळू राऊत तसेच पंढरपूर शहर मंत्री धैर्यशील रामदास पवार यांनी प्रत्यक्ष सहभागी होत स्वयंसेवकांचे कौतुक केले व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

अभियानाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व समन्वयक प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी केले. या उपक्रमासाठी प्रा. सुमित इंगोले, प्रा. इनामदार, प्रा. अर्जुन मसलकर आणि प्रा. अजित करांडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी एनएसएस अध्यक्ष अविनाश साळुंखे, उपाध्यक्ष विलास शेख, सचिव राज नागणे, सहसचिव संकेत खडतरे, कोषाध्यक्ष ओंकार पुजारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिश्रम घेतले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक उत्तरदायित्व, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ भारत अभियानाची मूल्ये प्रत्यक्ष कृतीतून जोपासत समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.