फॅबटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची "फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा.लि." कंपनीत निवड

फॅबटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची "फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा.लि." कंपनीत निवड
फॅबटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची "फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा.लि." कंपनीत निवड
सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे यांनी दिली.

फ्रान्स स्थित जागतिक दर्जाची ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा. लि. मध्ये महाविद्यालयातील तब्बल ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राहुल चौगुले, अन्नूर मुलाणी, तुषार लोखंडे, रोहित पांढरे, आकाश घुटुकडे, रणजित भुसणार, स्वप्नील दरगुडे, प्रियांका खिलारी आणि प्रणव शिंदे आदी ९ विद्यार्थ्यांनी "फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा. लि." कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. कंपनीकडून त्यांची निवड करण्यात आली आहे.

"फॉरेशिया एमिशन कंट्रोल इंडिया प्रा. लि." ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतिक स्तरावरील नामांकित कंपनी असून वाहनांसाठी अत्याधुनिक सीटिंग सिस्टीम, इंटिरिअर सिस्टीम, डॅशबोर्ड, सेंटर कन्सोल, डोअर पॅनेल तसेच पर्यावरणपूरक एमिशन कंट्रोल तंत्रज्ञान आणि हायड्रोजन स्टोरेज सोल्यूशन्स विकसित करण्यामध्ये कंपनीचे विशेष योगदान आहे. अशा बहुराष्ट्रीय कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये आनंदी वातावरणात निर्माण झाले आहे.

फॅबटेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, तांत्रिक प्रशिक्षण तसेच नियमित प्लेसमेंट तयारीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी होते. या तयारीच्या जोरावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. संपतकुमार बोडापटला आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.