पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली  श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  मुखदर्शन

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर विकास आराखड्यातून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू असून, मंदिर विकास आराखड्यातून झालेल्या कामांची तसेच करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करून माहिती घेतली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी  कुशल जैन, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रवीणकुमार घम उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.‌

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेतले तदनंतर मंदिर समितीच्या वतीने सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.