राज्यातील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक कोटीचे विमा सुरक्षा कवच

सोलापूर पॅटर्न राज्यात राबविणार - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राज्यातील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक कोटीचे विमा सुरक्षा कवच

राज्यातील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक कोटीचे विमा सुरक्षा कवच

सोलापूर पॅटर्न राज्यात राबविणार - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने दहा हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना विमा सुरक्षा कवच प्रदान करून राज्यात विशेष उपद्रव राबविला आहे. राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी १ कोटी रूपये सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच प्रदान करणेत येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज केंद्र प्रमुख पदी  निवड झालेल्या केंद्रप्रमुख पदस्थापनेचे आदेशाचे वितरण व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सॅलरी सुरक्षा कवच करार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांना नवीन वाहनाचे चावी प्रदान आज ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.

या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,स्टेट बॅंक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आनंदकुमार काटकर, मुख्य व्यवस्थापक अनिकेत शिवडेकर, ट्रेझरी  शाखेचे व्यवस्थापक अतुल मगदुम, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे , लेखाधिकारी मिरगळे प्रमुख उपस्थित होते.