डॉ.बी.पी.रोंगे यांची मुंबईतील शिक्षकांच्या आंदोलनाला भेट; आंदोलनाला जाहीर पाठिंबा

डॉ.बी.पी.रोंगे यांची मुंबईतील शिक्षकांच्या आंदोलनाला भेट; आंदोलनाला जाहीर पाठिंबा

डॉ.बी.पी.रोंगे यांची मुंबईतील शिक्षकांच्या आंदोलनाला भेट; आंदोलनाला जाहीर पाठिंबा

पंढरपूर - खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी डॉ. रोंगे यांनी आंदोलनाचे प्रमुख खंडेराय जगदाळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून शिक्षकांच्या विविध मागण्यांची माहिती घेतली. आंदोलनामध्ये २०, ४० आणि ६० टक्के अनुदानित शाळांना संचमान्यतेनुसार वाढीव अनुदान लागू करणे, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना समान टप्प्यावर अनुदान देणे, कमी पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना दिलासा देणे,अघोषित शाळा व तुकड्यांना अनुदानासह घोषित करणे, अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे तसेच शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा डॉ. रोंगे यांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यांतील शिक्षक तसेच आंदोलनात सहभागी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.