पंढरपूरकरांनी सायकल वारीत सहभाग नोंदवावा - उमेश परिचारक

सायकल वारी रिंगण 12 जुलैला होणार संपन्न

पंढरपूरकरांनी सायकल वारीत सहभाग नोंदवावा - उमेश परिचारक

पंढरपूरकरांनी सायकल वारीत सहभाग नोंदवावा - उमेश परिचारक

सायकल वारी रिंगण 12 जुलैला होणार संपन्न

पंढरपूर - देशातील सर्वात मोठा सायकल सोहळा हा सालाबाद प्रमाणे याही वर्षी पंढरपूर येथे संपन्न होत आहे त्याचप्रमाणे सायकल वारीतील रिंगण सोहळा रविवार 12 जुलै रोजी संपन्न होणार असून या सायकलवारीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक मधून 4000 सायकल स्वार यांनी नोंदणी केली असल्याची माहिती पंढरपूर सायकल क्लबचे प्रमुख उमेश परिचारक व पंढरपूर सायकलर्स क्लबचे अध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी माहिती दिली.

देशातील सर्वात मोठी सायकल रॅली त्याचप्रमाणे रिंगण सोहळा पंढरपूर येथे 12 जुलै रविवारी सकाळी सहा वाजता होणार असून यामध्ये शालेय संस्थांचा सहभाग लाभणार आहे परंतु सायकलवारीच्या प्रदक्षिणा मार्गावर स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागताची तयारी करावी असे आव्हान महेश भोसले व अनिकेत गोजारी यांनी केले आहे.
मागील वर्षी सायकल रिंगण सोहळ्यासाठी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या उपस्थित राहिल्या होत्या. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते.भारत सरकारच्या फिट इंडिया अंतर्गत सर्व सायकल स्वारांना फिट इंडियाचे टी-शर्ट देण्यात आले होते.

यावर्षी देखील सायकल रिंगण सोहळा मोठ्या आनंददायी वातावरणात पार पडणार असल्याची माहिती पंढरपूर सायकलर्स क्लबचे प्रकाश शेटे यांनी दिली. राज्यभरातून येणाऱ्या सायकल् स्वरांच्या नियोजनासाठी पंढरपूर सायकल्स क्लबचे सर्व मेंबर अविरत प्रयत्न करीत आहेत.