सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छता श्रमदान अभियान संपन्न...!
“आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच” - मा.कल्याणराव काळे
“आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाचीच” - मा.कल्याणराव काळे
सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने स्वच्छता श्रमदान अभियान संपन्न...!
पंढरपूर - “आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असून परिसर स्वच्छ ठेवण्यामुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.” असे मत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले. ते येथील सुप्रभात मित्र परिवाराच्या माध्यमातून स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांना स्वच्छता अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना बोलत होते.

'आरोग्य तना मनात, आनंद साऱ्या क्षणांत' या ब्रीदवाक्यास अनुसरून सन २००५ सालापासून आजपर्यंत १८ वर्षे सलगपणे आरोग्याबरोबरच, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या पंढरपूर येथील 'सुप्रभात मित्र मंडळा' च्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने स्वच्छता सप्ताहाच्या निमित्ताने लिंक रोड आणि कराड रोड या परिसरामध्ये स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. पहाटे सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत कराड रोड तसेच लिंक रोड या परिसरामध्ये रस्ता दुभाजकावर उगवलेले अनावश्यक रोपटी व तन काढण्यात आले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त कचरा गोळा करून परिसराची स्वच्छता केली.
यावेळी सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.धनाजीबापू देशमुख, सचिव मा.सोमनाथ देशमुख, मा.सुनीलदादा पाटील, मा.उद्धवबापू बागल, मा. सुभाषशेठ मर्दा, मा.देवानंद गुंड-पाटील, मा.राजेंद्र शिंदे, मा.विष्णूपंत रेडे, मा.सलीमशेठ भायानी, मा.त्रिंबक हिवरे, मा.पांडुरंग ढवळे, मा.सुखदेव चव्हाण,अॅड.सोमनाथ मुचलंबे, प्रा.धिरजकुमार बाड, मा.विवेक कवडे, मा.प्रदीप कुलकर्णी, मा.पवनकुमार शहा,डॉ.धोत्रे,मा.आर.डी.पवार, मा. महेशराव चौगुले,मा.सुखदेव साळुंखे,मा.राजाभाऊ नरसाळे, मा.नितीन कांबळे, मा.हनुमंत शिराळ, मा.अमर पाटील, मा.उन्मेष चोरगे - पाटील मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख मा.राजेंद्र भोसले, कवी रवि सोनार तसेच येथील फ्रेंडस ग्रुपच्या अनेक सभासदांनीही सहभाग घेतला.
सुमारे दोन तासाच्या स्वच्छता श्रमदान अभियानाच्या समारोपावेळी सुप्रभात मित्र परिवाराचे अध्यक्ष मा. धनाजीबापू देशमुख यांनी स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सभासदांना मार्गदर्शन करून आभार मानले.