गणेशभक्तांच्या आनंदात मनसेचा सहभाग; गणेशभक्तांना मनसेकडून मोफत गणेशमूर्ती वाटपाचे आयोजन
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम
गणेशभक्तांच्या आनंदात मनसेचा सहभाग; गणेशभक्तांना मनसेकडून मोफत गणेशमूर्ती वाटपाचे आयोजन
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम
पंढरपूर - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मधील गणेशभक्तांसाठी मोफत गणेशमूर्ती वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या लकेरी गल्ली येथील संपर्क कार्यालयात गणेशमूर्तींचे वाटप केले जाणार आहे.

गणेशोत्सव हा सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. प्रत्येक कुटुंबाला भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करता यावी, तसेच गणेशोत्सवाचा आनंद सर्वांना घेता यावा, या उद्देशाने मोफत गणेशमूर्ती वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
मनसेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १७ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध सण-उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच सामाजिक उपक्रमांच्या मालिकेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी मोफत गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या उपक्रमातून नागरिकांशी असलेले आपुलकीचे नाते अधिक दृढ करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रभागातील गणेशभक्तांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याने नागरिकांकडून मनसेच्या उपक्रमाचे स्वागत होत आहे. आगामी गणेशोत्सव भक्तीभावाने आनंदाने आणि सामाजिक एकोप्याने साजरा करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.