मा.लक्ष्मणराव (तात्या) धनवडे यांचा वाढदिवस विविध समाजिक उपक्रमांनी साजरा ;
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊचे वाटप, वृक्षारोपण उपक्रमांनी साजरा
लक्ष्मणराव (तात्या) धनवडे यांचा वाढदिवस विविध समाजिक उपक्रमांनी साजरा ;
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊचे वाटप, वृक्षारोपण उपक्रमांनी साजरा
पंढरपूर - पंढरपूर-मंगळवेढा, माढा-करमाळा व मोहोळ विधानसभा क्षेत्रात आपल्या समाजाभिमुख कार्यातून व्यापक जनसंपर्क निर्माण करणारे, उजनी धरणग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने आंदोलने व मोर्चे उभारणारे तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जिव्हाळ्याचे नाते जपणारे जनमान्य नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव(तात्या) धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तसेच गोरगरीब जनतेच्या न्यायहक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे लक्ष्मणराव धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नारायण चिंचोली, भैरवनाथवाडी, गुंड वस्ती व धुपे वस्ती येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्टील पाण्याच्या बाटल्या व खाऊचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

समाजातील वंचित व गरजू घटकांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या सामाजिक उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी सरपंच संजय घाडगे, लक्ष्मण तात्या कोले, गहिनीनाथ चव्हाण, विष्णूपंत माने, शिवसेनेचे महावीर देशमुख, माऊली बरडे, पोपट पाटील,दत्तात्रय मस्के, विठ्ठल माने,हरिभाऊ माने, विजय कोळेकर, लहुदादा नलवडे, दादासाहेब कोळेकर, डॉ.आनंद गाजरे, दादासो डुबल, पांडुरंग घाडगे, दिलीप गाजरे, महेश माने, भाऊसाहेब माने, दादा सोनवर, आप्पासाहेब वाघमोडे, शिवाजी भोसले,डॉ.महादेव सरडे,भास्कर गुंड, दीपक गुंड, बापु वाघमोडे, नारायण गुंड, सचिन घाडगे,नवनाथ नलवडे,आण्णा डुबल,मारुती वाघमोडे, शिवाजी वसेकर, आण्णा हजारे, सुनील माने,संदीप कोले, बाळासाहेब सुतार, रोहित गुंड, माऊली मस्के,औदुंबर गुंड, माऊली लवंड, सचिन घाडगे,सचिन भडकवाड,दत्तात्रय बनसोडे, बाळू बनसोडे,मुकुंद घाडगे,पांडुरंग पांढरे,बापू चव्हाण,अभिजीत कोले,मारुती चव्हाण,परमेश्वर कंदारे,सज्जन गुंड, भानुदास गाजरे,दादा जानकर, तानाजी वसेकर, तुकाराम कोळी,साधू नलवडे, धर्मराज हजारे, प्रकाश जाडकर, कुबेर गायकवाड, सुधीर सोनवर, भाऊसाहेब हजारे,दत्तात्रय हराळे,गणेश अजगरे, गणेश डुबल, संतोष महाडीक,शिवाजी गाजरे, महादेव डुबल, प्रवीण खरात, गणेश कोळी, संगम अंकुशराव, गुलाब कोळेकर, प्रशांत कोळेकर, राहुल बुधनेर,भजनदास डुबल, योगेश लामकाने, हनुमंत पवार, शाम गायकवाड, आकाश कोळेकर, अक्षय सरवदे, डॉ. विकास शिंदे, स्वप्नील सावळकर यांच्यासह पांडुरंग परिवार, राजे ग्रुप 499, L.D. ग्रुप तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठीचा सातत्यपूर्ण संघर्ष हीच मा.लक्ष्मणराव (तात्या) धनवडे यांच्या कार्याची ओळख असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘समाजासाठी काहीतरी देण्याची’ सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली.