प्रा.शिवराज मोटेगावकर सरांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात विविध उपक्रमांनी साजरा
प्रा.शिवराज मोटेगावकर सरांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात विविध उपक्रमांनी साजरा
पंढरपूर - लातूर येथील आरसीसी (RCC) क्लासेसचे सर्वेसर्वा प्रा. शिवराज रघुनाथराव मोटेगावकर (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी पंढरपूर येथे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासत सरांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवराज मोटेगावकर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व शिवरत्न ज्युनिअर कॉलेज, गादेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रा.गणपत मोरे सर,अनिल आप्पा बागल,अजय मोरे,स्वप्निल पोरे उपस्थित होते.
दिवसभराच्या उपक्रमांची सुरुवात सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिर समोरील नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक घालून करण्यात आली. विठुराया चरणी अभिषेक करून मोटेगावकर सरांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.यानंतर दिवसभरात विविध ठिकाणी सेवाभावी कार्यक्रम पार पडले:
सकाळी १० वाजता गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.सकाळी 11 वाजता कोर्ट रोड येथील 'पालवी' संस्थेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची ओढ असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.सायंकाळी ६ वाजता नामाप्रसाद नामा रोटी फाउंडेशन येथे मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन श्री. गणपत शिवाजी मोरे (संस्थापक अध्यक्ष, शिवराज मोटेगावकर पब्लिक स्कूल, गादेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. केवळ जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा केलेल्या या वाढदिवसाचे पंढरपूर परिसरात विशेष कौतुक होत आहे.