शेतकरी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेला “आदर्श संस्था पुरस्कार” - शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा
शेतकरी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्थेला “आदर्श संस्था पुरस्कार” - शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा

पंढरपूर,गादेगाव - शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शेतकरी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था, गादेगाव या संस्थेला यंदाचा मानाचा “आदर्श संस्था पुरस्कार” बहाल करण्यात आला आहे. या सन्मानामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संस्थेच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली आहे.

संस्थेने अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि स्पर्धात्मक वृत्ती रुजवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देत त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा देण्याचे काम संस्थेकडून सातत्याने केले जात आहे. याच कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार मिळाल्याचे मानले जात आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणपत मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, कार्यकर्ते व सर्व समर्थकांनी एकत्रितपणे घेतलेल्या परिश्रमांचे हे यश असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “ही केवळ संस्थेची नव्हे तर संपूर्ण गावाची अभिमानास्पद उपलब्धी आहे,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असून भविष्यातही शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे.प्रकल्प संचालिका वर्षा मोरे, सहशिक्षक लीना बागल ,शितल बागल , फर्जना पटेल, प्राचार्य तनुजा यादव, उप प्राचार्य नियाज मुलाणी, दिपक देशमुख, नागेश कांबळे, स्वप्नील पोरे,पुनम पाटोळे, सोनाली मागाडे ,मोनाली गायकवाड, शाईन शेख, तेजश्री गव्हाणे ,प्रवीण यादव ,महाकू खांडेकर, वैभव माने ,आविता कांबळे, अजय मोरे, आदी शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या