रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग (सातारा) विभागीय समन्वय समिती सदस्यपदी संभाजी शिंदे यांची निवड; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग (सातारा) विभागीय समन्वय समिती सदस्यपदी संभाजी शिंदे यांची निवड; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सत्कार

रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग (सातारा) विभागीय समन्वय समिती सदस्यपदी संभाजी शिंदे यांची निवड; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सत्कार

पंढरपूर -  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी हिरालाल शिंदे यांची आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळख असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग (सातारा) विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

मागील २५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनात शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संभाजी शिंदे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, गरजू नागरिकांना वेळोवेळी मदतीचा हात, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे त्यांना समाजात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. पक्ष संघटनेचे कार्य करत असताना सर्व पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत.

तसेच, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी मंदिर प्रशासन, भाविकांच्या सोयी-सुविधा, मंदिर परिसरातील विकासकामे, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम तसेच मंदिराशी संबंधित जनहिताच्या विषयांमध्ये सक्रिय सहभाग घेत मोलाचे योगदान दिले आहे. भाविकांच्या सुविधा वाढविणे, मंदिराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय राखणे या माध्यमातून त्यांनी मंदिर समितीच्या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड करण्यात आल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या निवडीबद्दल श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रतिमा, तुळशीहार व उपरणे देऊन संभाजी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मंदिर समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), सल्लागार परिषद सदस्य ह.भ.प. महादेव महाराज शिवणीकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार तसेच मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.