MHT-CET परीक्षेत नीरज डोंगरे यांचे यश; ८७ पर्सेंटाइल मिळवून मारली बाजी ; नागेश फाटे यांच्या कडून कौतुक.
MHT-CET परीक्षेत नीरज डोंगरे यांचे यश; ८७ पर्सेंटाइल मिळवून मारली बाजी ; नागेश फाटे यांच्या कडून कौतुक.
पंढरपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या MHT-CET परीक्षेच्या निकालात नीरज दिपक डोंगरे याने ८७ पर्सेंटाइल गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. नीरजच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

नीरजच्या या यशाबद्दल त्याचा सत्कार नागेश फाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना नागेश फाटे यांनी सांगितले की, "नीरजची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही शिखर गाठता येते."

या आनंददायी प्रसंगी ताऊ डोंगरे, दिपक डोंगरे, भास्कर गायकवाड, कांचेंश्वर बचूटे, नवनाथ फाटे, निवृत्ती पाटील आणि विनय शिंदे हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नीरजच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना आणि मार्गदर्शकांना दिले आहे.