लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझी उमेदवारी ; महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांची भूमिका
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी माझी उमेदवारी ; महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांची भूमिका
पंढरपूर - लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी निवडणुकीत उभा आहे. आतापर्यंत होम टू होम प्रचार केला असन मतदारांपर्यंत पोहोचलो आहे. अनेक मतदारांनी, 'तुमची उमेदवारी असल्याने आम्हाला महत्त्व आले. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात असल्याने पालकमंत्री आमच्यापर्यंत आले,' असे मत व्यक्त केले.

मतदारांना भेटल्यानंतर व त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. नाराज असलेल्या मतदारांनी मदतीचे आश्वासन दिल्याने अपेक्षेपेक्षा अधिक मतदान होईल आणि निकालावेळी चमत्कार घडेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांनी मांडली.मतदारसंघातील ६१६ (एक मृत) मतदारांपैकी आम्ही ५०० ते ५५० मतदारांपर्यंत पोहोचलो आहोत. सर्वच मतदारांनी उमेदवारीचे स्वागत केले आहे.
यामध्ये मतदारांच्या नाराजीचा लाभ आम्हाला नक्कीच निवडणुकीत होणार आहे. शिवाय अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहेत, ही आमची जमेची बाजू असून लोकशाही मार्गान आम्ही या निवडणुकीस सामोरे जात असून मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले.