मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पंढरपुरात विविध उपक्रमाने संपन्न

विद्यार्थ्यांना शालेय सहित्य वाटप, वृक्षारोपण,वृद्धाश्रमात अन्नदान,विठ्ठलाला महाआरती,अपंगांना सायकल वाटप करत उत्साहात साजरा

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पंढरपुरात विविध उपक्रमाने संपन्न

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पंढरपुरात विविध उपक्रमाने संपन्न

विद्यार्थ्यांना शालेय सहित्य वाटप, वृक्षारोपण,वृद्धाश्रमात अन्नदान,विठ्ठलाला महाआरती,अपंगांना सायकल वाटप करत उत्साहात साजरा

पंढरपूर - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील नामदेव पायरी येथे विठ्ठलाच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना लाडू वाटप करण्यात आले. तसेच ज्ञानोबा तुकाराम व राम कृष्ण हरी च्या गजरात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना दप्तर-वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच अपंगांना सायकल वाटप, तसेच वृद्धाश्रम येथे वृद्ध माता-पित्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

ज्या नागरिकांना स्वतःची घरे नाहीत अशा नागरिकांसाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून मनसेच्या वतीने फॉर्म भरून घेऊन त्यांना हक्काची घरे देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. यावेळी महिला व नागरिकांनी फॉर्म देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, तालुका उपाध्यक्ष कृष्णा ताड, प्रदीप परचंडे, मोहोळ विधानसभा अध्यक्ष पवन बेदरे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, संतोष वाघमारे, अंबादास वायदंडे, लक्ष्मण रणदिवे, दिनेश पांढरे, अजित ननवरे, अक्षय नेहतराव, मारुती ऐवळे,धनाजी चव्हाण, गणेश चव्हाण, मच्छिंद्र पुजारी,श्रेयश ताड,जमिर सय्यद आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.