दिवाळीनिमित्त ओंकार शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप

दिवाळीनिमित्त ओंकार शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप

दिवाळीनिमित्त ओंकार शुगरतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप

भाळवणी : ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रा. लि., युनिट नं. १४, भाळवणी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्यात आले.

ओंकार उद्योग समूहाचे चेअरमन तसेच अशोक नागरी सहकारी बँकेचे मार्गदर्शक माननीय श्री. बाबुराव दादासाहेब बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कारखान्याचे जनरल मॅनेजर माननीय श्री. रवींद्र साळुंखे यांच्या शुभहस्ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कारखाना प्रशासनाने हा उपक्रम राबविला.

याप्रसंगी नीलकंठ गवळी, शरद लाडे यांच्यासह अनेक ऊस उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेच कारखान्याचे खातेप्रमुख, विविध विभागांचे विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखाना व्यवस्थापनाने दिवाळीनिमित्त राबविलेल्या या उपक्रमाबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.