जवळा विकास सेवा सोसायटीचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा ; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

सांगोला येथील जवळा विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

जवळा विकास सेवा सोसायटीचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा ; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

जवळा विकास सेवा सोसायटीचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा ; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

सांगोला येथील जवळा विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

सांगोला - जवळा ता सांगोला येथील विकास सेवा सोसायटीचे नाव गेल्या अनेक वर्षापासून ऐकत आलो होतो मात्र या संस्थेला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला. या संस्थेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट असून राज्यातील अन्य सहकारी संस्थांनी या विकास सेवा सोसायटीचा आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले. शनिवार दि. १९ रोजी जवळा ता सांगोला येथून ते बोलत होते यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यातील ज्या विकास संस्था चांगल्या पद्धतीने चालवल्या जातात अशा संस्थांना अटल योजनेतून गोदाम दिले जात आहेत असे सांगून तरुणांनी पुढे येऊन व्यवसाय केले पाहिजेत.येणाऱ्या काळात तरुणांसह चांगल्या लोकांनी राजकारणात यावे,ज्यांना जनतेच्या प्रश्नाची जाण आहे अशाच लोकांना निवडून देऊन आपणच आपल्या गावाचा विकास करूयात असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना बाबासाहेब पाटील यांनी केले. शनिवारी त्यांनी जवळा ता. सांगोला येथील जवळा विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

यावेळी सभापती पुनम इंगवले, सहाय्यक निबंधक डॉ वैशाली साळवे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, बाळासाहेब एरंडे, नगरसेविका तनुजा एरंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, शहाजीराव नलवडे, ज्येष्ठ नेते तानाजी पाटील, सरपंच सज्जन मागाडे, अरुण घुले , प्रशांत वलेकर,सदाशिव साळुंखे, विजय येलपले, डॉ राज मिसाळ, कृष्णदेव खांडेकर, संस्थेचे चेअरमन सुनील साळुंखे,व्हा चेअरमन, सचिव संजय साळुंखे, संचालक सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले , प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय विकास संस्थेचे कार्यालय आणि झेडपीची शाळा असली पाहिजे असे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत राज्यात अनेक विकास संस्था तोट्यात असताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा विकास संस्थेने मात्र १०० टक्के वसुली बरोबरच ,सोनेतारण, पिग्मी स्वस्त धान्यातून लोकांना धान्य वाटप करणे अशाप्रकारे चांगल्या पद्धतीने संस्था चालवली जाते ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. प्रास्ताविक माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी केले सुत्रसंचलन बाळासाहेब शिंदे यांनी केले तर आभार विलास घुले यांनी मानले.

प्रारंभी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जवळा नगरीत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, सभापती पूनम इंगवले,नगरसेविका तनुजा एरंडे, चारुशिला काटकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

जवळा विकास संस्थेला भेट देण्याचे अनेक दिवसापासूनचे नियोजन होते परंतु तो योग येत नव्हता अखेर आज या संस्थेला भेट देण्याचा योग जुळून आल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आवर्जून सांगितले.