श्री विठ्ठल अर्बन क्रेडिट सोसायटीत गणरायाची विधिवत पूजा संपन्न

संस्थापक चेअरमन नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन संपन्न

श्री विठ्ठल अर्बन क्रेडिट सोसायटीत गणरायाची विधिवत पूजा संपन्न

श्री विठ्ठल अर्बन क्रेडिट सोसायटीत गणरायाची विधिवत पूजा संपन्न

संस्थापक चेअरमन नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन संपन्न

पंढरपूर -  येथील श्री विठ्ठल अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. च्या वतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना व विधिवत पूजा मोठ्या भक्तिभावात करण्यात आली.

संस्थेचे संस्थापक चेअरमन नागेश एकनाथ फाटे यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी विघ्नहर्त्याच्या चरणी संस्थेच्या प्रगतीसाठी तसेच सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांच्या सुख, समृद्धी आणि आर्थिक भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी बोलताना फाटे म्हणाले की, "सहकार हाच समृद्धीचा मार्ग आहे. श्री विठ्ठल अर्बन सोसायटी सर्वसामान्यांचे आर्थिक पाठबळ आहे. गणरायाच्या आशीर्वादाने संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचे उपक्रम अधिक जोमाने राबवले जातील आणि संस्थेची वाटचाल अधिक विश्वासाने पुढे जाईल."

गणेशोत्सवामुळे संस्थेच्या परिसरात प्रसन्न व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. पूजेनंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी अण्णा नागटिळक, ॲड. पांडुरंग चवरे, शिवाजीराव रणदिवे, गोरख बागल, संजय पवार, नवनाथ बचुटे, अर्जुन सावंत, भास्कर गायकवाड, हनुमंत फाटे, नवनाथ फाटे, मारुती घाडगे, ओंकार फाटे, संग्राम कापसे, रमेश फाटे, शुभम फाटे, शशांक फाटे यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.