अहिल्यादेवींच्या आदर्श कार्याचा वारसा जपणे ही काळाची गरज – प्राचार्य तानाजी बुरूंगले
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
अहिल्यादेवींच्या आदर्श कार्याचा वारसा जपणे ही काळाची गरज – प्राचार्य तानाजी बुरूंगले
फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. समाजहित, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी, “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य आजही समाजासाठी दीपस्तंभ आहेत. लोकहिताला प्राधान्य देत त्यांनी आदर्श शासनव्यवस्थेचा नमुना निर्माण केला. त्यांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रा. स्वप्निल बंडगर यांनी मनोगत व्यक्त करताना अहिल्यादेवींच्या सामाजिक, धार्मिक व विकासाभिमुख कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि जनकल्याणकारी धोरणांमुळे भारतीय इतिहासात त्यांचे स्थान अजरामर असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास ग्रंथपाल प्रा. सुधीर माळी, प्रा. भावना माईनकर, स्वप्निल रूपनर, केशव बनसोडे, दत्तात्रय शिंदे, श्रीपती सातपुते, महासिद्ध दवले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले आणि समाजसेवा, न्याय व विकासाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.