मंत्री योगेश कदम यांची आमदार राजू खरे यांनी घेतली भेट;मतदार संघातील विविध प्रश्नांवर केली चर्चा

मंत्री योगेश कदम यांची आमदार राजू खरे यांनी घेतली भेट;मतदार संघातील विविध प्रश्नांवर केली चर्चा

मंत्री योगेश कदम यांची आमदार राजू खरे यांनी घेतली भेट;मतदार संघातील विविध प्रश्नांवर केली चर्चा

मोहोळ - मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध समस्या आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

शहरी भागातील कायदा-सुव्यवस्था व नागरिकांची सुरक्षितता, महसूल विभागातील प्रलंबित कामे व जमिनी/दाखल्यांशी संबंधित अडचणी, ग्रामविकास व पंचायत राज अंतर्गत मूलभूत सुविधा व विकासकामे, तसेच राशन दुकानांमधील अनियमितता, अन्नधान्य पुरवठ्यातील अडचणी आणि अन्न व औषधांच्या गुणवत्ता संबंधित प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्व प्रश्नांवर संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा मिळावा आणि मतदारसंघातील विकासकामांना गती मिळावी, यासाठी ठोस पाठपुरावा करण्यात आला.