मोहोळ येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ.स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा

मोहोळ येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ.स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा

मोहोळ येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार डॉ.स्मिताताई जाधव व कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा

मोहोळ - मोहोळ येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव व शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री.कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

मोहोळ विधानसभा प्रभारी मा.आमदार कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, मा.आमदार राजनजी पाटील, मा.आमदार यशवंत माने मुख्यमंत्री पानंद रस्ते मोहोळ विधानसभा अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, मोहोळ तालुकाध्यक्ष सतीश काळे, रमेश माने, सरचिटणीस विकास वाघमारे, ज्येष्ठ नेते देवानंद गुंड, जिल्हा दूध संघाचे व्हाइस चेअरमन दीपक माळी, जिल्हा बँकेचे माजी संचालक भारत सुतकर, माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे, माजी तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, मोहोळ पंचायत समिती सभापती असलम चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव, लखन शिंदे, बालाजी नरुटे, पंचायत समिती सदस्य संजीव खिलारे, अंकुश अवताडे, सुशील क्षीरसागर, राजकुमार पाटील, दीपाली कोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे प्रभावी प्रतिनिधित्व करण्यासाठी भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.