शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे घवघवीत यश

पंढरपूर गादेवांव - येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील विद्यार्थ्यांनी पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षा मध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यामध्ये आर्यन अनिल साठे ,समीक्षा अतुल मस्के ,तनया शरद बागल, आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी यशस्वी होताना नेहमीच दिसत असतात.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, प्रकल्प संचालिका वर्षा मोरे, सहशिक्षक लीना बागल ,शितल बागल , फर्जना पटेल, प्राचार्य तनुजा यादव, उप प्राचार्य नियाज मुलाणी, दिपक देशमुख, नागेश कांबळे, स्वप्नील पोरे,पुनम पाटोळे, सोनाली मागाडे , मोनाली गायकवाड, शाईन शेख, तेजश्री गव्हाणे ,प्रवीण यादव ,महाकू खांडेकर, वैभव माने ,आविता कांबळे, अजय मोरे, आदी शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा यांनी अभिनंदन केले.