पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे प्रचार मेळावा.!
मा.आ.जयंत आसगांवकर यांनी साधला शिक्षकांशी संवाद
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड येथे प्रचार मेळावा.!
मा.आ.जयंत आसगांवकर यांनी साधला शिक्षकांशी संवाद
पंढरपूर - प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास शिक्षक, कार्यकर्ते आणि मान्यवरांचा अत्यंत अभूतपूर्व आणि भरघोस प्रतिसाद मिळाला.

यावेळी माजी मुख्यमंत्री व मार्गदर्शक मा.पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

तसेच सौ. सत्त्वशीलाताई चव्हाण, सातारा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. नागदेव आप्पा पाटील, सातारा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. अशोक पाटील, सातारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. राहुल पवार, सातारा जिल्हा परिषद सदस्य मा. सुनंदा पाटील, आणि पंचायत समिती सदस्य मा. रवींद्र बेडेकर,नगरसेवक राहुल भोसले, माजी नगरसेवक सौरभ पाटील, आजित पाटील, मुबिन बागवान, प्रदीप जाधव, गजानन आडवळकर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.!
शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.