इस्कॉन पंढरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा होणार
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भू-वैकुंठ पंढरपूर स्विच बाटली बंद पाण्याचा होणार शुभारंभ
इस्कॉन पंढरपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा होणार
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भू-वैकुंठ पंढरपूर स्विच बाटली बंद पाण्याचा होणार शुभारंभ
पंढरपूर - आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन पंढरपूरच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी 4 सप्टेंबर शुक्रवार पासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. जन्माष्टमीनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात मंगलारतीने होणार असून, त्यानंतर हरीनाम जप, श्रीकृष्ण दर्शन, कृष्णकथा, श्रीकृष्ण कथा, चित्रकला स्पर्धा तसेच संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यजमानांच्या वतीने विशेष अभिषेक करण्यात येणार असून, महाभिषेक आणि श्रीकृष्णाला छप्पन भोग अर्पण करण्यात येणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन इस्कॉन पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर भू-वैकुंठ पंढरपूर स्विच बाटली बंद पाण्याचा होणार शुभारंभ -
पंढरपूर धामाची आध्यात्मिक ओळख देशाच्या कानाकोपन्यात तसेच जगभर पोहोचविण्याचा संकल्प इस्कॉन पंढरपूरने केला आहे. 'भू बैकुंठ पंढरपूर' या नावातून पंढरपूरच्या आध्यात्मिक वैभवाचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
SWITCH पॅकेज्ड ड्रीकिंग वॉटरच्या माध्यमातून शुद्ध, मिनरलयुत्तत आणि गुणवत्तापूर्ण पाण्याचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याबरोवरच पंढरपूर धामाची ओळख जगभर निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या भतितमय वातातवणात नागरिकांनी व भाविकांनी आपल्या संपूर्ण परिवारासह या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉन पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.