आमदार राजू खरे यांचा सरवदे कुटुंबाला आधार ; सरवदे कुटुंबासाठी आ. राजू खरे बनले मदतीचे दूत
आमदार राजू खरे यांचा सरवदे कुटुंबाला आधार ; सरवदे कुटुंबासाठी आ. राजू खरे बनले मदतीचे दूत
पंढरपूर : मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील सौ. लक्ष्मी शशिकांत सरवदे यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आमदार राजू खरे यांनी भरीव आर्थिक मदत केली. संकटाच्या काळात सरवदे कुटुंबाला मदतीचा हात देत आमदार राजू खरे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सौ. लक्ष्मी सरवदे यांना मूत्रपिंडातील खडा, मूत्राशयाची सूज आणि स्कार एंडोमेट्रिओसिस या आजारांचे निदान झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतरची औषधे आणि पुढील उपचारांचा खर्च भागवताना त्यांच्या कुटुंबाची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे. मोलम जुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सरवदे कुटुंबाला शस्त्रक्रियेचा खर्च भागवण्यासाठी उसनवारी करण्यासह कर्जही घ्यावे लागले.

अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाची आर्थिक अडचण लक्षात घेऊन उपचारांचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका व्हावा, या उद्देशाने आमदार राजू खरे यांनी आर्थिक मदत केली. आजारपणाच्या कठीण काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळणे महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणींमुळे उपचारांमध्ये अडथळे येऊ नयेत, या मदतीमुळे सरवदे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर
आमदार राजू खरे यांनी सर्व सामान्य नागरिकांच्या कठीण काळात सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचा संदेश दिला आहे. आजारपणाच्या कठीण काळात रुग्णाला आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. गरजू नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.
आमदार राजू खरे (मोहोळ विधानसभा)