ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेने राबवली सह्यांची मोहीम;तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेने राबवली सह्यांची मोहीम;तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत
पंढरपूर - राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सह्यांची मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पंढरपूर यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सह्यांची मोहीम मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या मोहिमेला भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

याप्रसंगी अनिल बागल, कृष्णा मासाळ, गणेश पिंपळनेरकर, गणेश उबाळे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण पाखरे, मारुती एवळे, विजय वाघमारे तसेच विद्यार्थी सेनेचे औदुंबर गडकरी उपस्थित होते. मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी आणि आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी मनसेच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी अनेक नागरिकांनी सह्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला.निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राबविण्यात आलेल्या या सह्यांच्या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद हा मनसेच्या आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आयोगाने निष्पक्षपणे काम करणे आवश्यक आहे, अशी भूमिका या मोहिमेच्या माध्यमातून मांडण्यात आली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागरिकांचा पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने मनसेने हा उपक्रम हाती घेतला होता.