पंढरपुरात जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या विजयाचा निर्धार!
पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद; स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती
पंढरपुरात जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या विजयाचा निर्धार!
पदवीधर व शिक्षक मतदारांशी संवाद; स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला गती
पंढरपूर - पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी-महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पंढरपूर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित या बैठकीत पदवीधर, शिक्षक आणि युवा सहकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, तसेच संघटनात्मक पातळीवर प्रभावी नियोजन करून प्रचाराला गती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, ज्येष्ठ नेते दिनकर भाऊ मोरे, भाजपा सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, युवा नेते प्रणवदादा परिचारक, सभापती शुभम आगावणे, हरीष दादा गायकवाड, राजू बापू गावडे, भाजपचे राज्य परिषद सदस्य लक्ष्मणराव धनवडे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, दिलीप चव्हाण, प्रशांत भैय्या देशमुख, पंडितराव भोसले, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काका भोसले, राज्य परिषद सदस्य तानाजी वाघमोडे, भगवानराव देशमुख, मंडल अध्यक्ष हर्षल कदम व रोहित पानकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे सदस्य, भाजपचे पदाधिकारी, शिक्षक, पदवीधर मतदार आणि युवा सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना न्याय देणे, त्यांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणे आणि विकासाभिमुख विचारांना बळ देणे, या उद्देशाने महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या प्रचारात समन्वय राखून दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

शिक्षक व पदवीधरांच्या हितासाठी आणि विकासाभिमुख विचारांना बळ देण्यासाठी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.