अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्टहृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन -तालुकाध्यक्ष,प्रशांत खलीपे

अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्टहृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन -तालुकाध्यक्ष,प्रशांत खलीपे

अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्टहृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन - प्रशांत खलीपे

पंढरपूर - केमिस्टहृदय सम्राट श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी केमिस्टच्या व सर्वसामान्य समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती केमिस्ट संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा खजिनदार व पंढरपूर तालुकाध्यक्ष श्री प्रशांत खलीपे यांनी दिली.

अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष केमिस्ट हृदय सम्राट श्री जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण भारतभर एकाच दिवशी एका वेळेस भव्य रक्तदान महासंकल्प आयोजन करण्यात आले आहे.मा.जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी  केमिस्ट संघटनेला स्वतःचे कुटुंब समजून संघटनेतील प्रत्येक सदस्य सन्मानाने जगला पाहिजे हे संकल्पना मनात बाळगून संघटनेबरोबरच समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. मा.जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या कार्याविषयी आपली श्रद्धा व प्रेम व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या वतीने विविध उपक्रम राबवले आहेत.

हे शिबिर शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी आरती मंडप मनमाडकर ग्राउंड, भक्तिमार्ग, एलआयसी ऑफिस समोर डॉक्टर पाटील हॉस्पिटल शेजारी या ठिकाणी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. तरी वरील शिबिराचा केमिस्ट व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच समाजातील विविध स्तरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रशांत खलीपे, सचिव महादेव जाधव, खजिनदार श्रीरंग राहीरकर यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी केमिस्ट बंधू-भगिनी प्रयत्न करीत आहेत.