पंढरपूरच्या विकासासाठी भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली निधीची मागणी

पद्मावती उद्यानापासून सोलार प्रकल्पापर्यंत ७ मोठ्या मागण्या!

पंढरपूरच्या विकासासाठी भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली निधीची मागणी

पंढरपूरच्या विकासासाठी भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली निधीची मागणी

पद्मावती उद्यानापासून सोलार प्रकल्पापर्यंत ७ मोठ्या मागण्या!

पंढरपूर - कृषी पंढरी ११ व्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले असता, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी निधीची मागणी करत विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ मुख्यमंत्र्यांसमोर मांडला.

मा. आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट, गटनेते राजू सर्वगोड, नगरसेवक ॲड. सुनील वाळूजकर यांच्यासह महिला नगरसेविका व नगरसेवकांनी पंढरपूर शहरातील विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांसाठी मोठ्या निधीची मागणी केली.

या मागण्यांमध्ये शहरातील पद्मावती उद्यान विकसित करण्यासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी, संत पेठ परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी डीपी रस्त्यांचे विकासकाम, तसेच जुना अकलूज नाका ते राजमाता अहिल्या पूल या मार्गावरील डीपी रस्ता विकसित करण्याचा समावेश आहे.

श्री संत तुकाराम महाराज नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाढीव २० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय पंढरपूर नगरपालिकेसाठी ३.५ मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प शहरातील विविध उपनगरीय भागांमध्ये उद्याने व ओपन जिमची निर्मिती आणि राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत रस्ते विकासकामांसाठी दुसरा व तिसरा हप्ता मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

एकूणच, कृषी महोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर शहराच्या विकासाचा ‘रोडमॅप’च मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आला असून, आता या मागण्यांना शासनाकडून किती निधी मिळतो, याकडे पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.