पंढरपुरात नवीन आयकर कायद्यावर मार्गदर्शन

पंढरपुरात नवीन आयकर कायद्यावर मार्गदर्शन

पंढरपुरात नवीन आयकर कायद्यावर मार्गदर्शन

पंढरपूर - पंढरपूर व्यापारी महासंघ व व्यापारी कमेटी यांच्या वतिने नविन आयकर कायदा २०२५ हा १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून या नविन कायद्याची माहीती व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना व्हावी यासाठी कर्मयोगी सभागृह अर्बन बँक पंढरपूर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजीत केले होते.

पुणे विभागाचे अॅडीशनल कमिशनर (इन्कम टॅक्स) राजेश गवळी (आयआरएस) यांनी सुमारे एक तासांहून अधिक वेळात नविन कायद्या बाबत मार्गदर्शन केले.

तरूण व्यापारी उद्योजकांनी आयकर विभागाच्या वेबसाईट व पोर्टल वरून आपल्याला हव्या त्या भाषेमधुन माहीती घेऊन राष्ट उभारणीच्या कार्यात आपले योगदान द्यावे असे आवाहन राजेश गवळी यांनी केले.

कार्यक्रमास पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, उमेश विरधे, सुभाष पाटील, सत्यविजय मोहोळकर, शिरीष पारसवार, सी.ए. संजिव कोठाडीया, संजय अभ्यंकर, सोमनाथ डोंबे, महावीर फडे, रा.पा.कटेकर, राजगोपाल भट्टड, दिपक शेटे उपस्थित होते.