भा.ज.पा.सोलापूर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी बालाजी वाघमारे यांची नियुक्ती
भा.ज.पा.सोलापूर जिल्हा पूर्व अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी बालाजी वाघमारे यांची निवड
पंढरपूर - ता.पंढरपूर भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्व अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी बालाजी श्रीकांत वाघमारे यांची नियुक्ती करण्यात करण्यात आले असून या निवडीचे पत्र जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चांगदेव कांबळे, प्रणव परिचारक पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगवणे,जि प सदस्य नंदकुमार वाघमारे, बाजार समितीचे उपसभापती, राजू गावडे,भाजपा तालुका अध्यक्ष प्रा.सुभाष मस्के मा नगरसेवक खंडू खंडारे , शहराध्यक्ष लाला पानकर माजी नगरसेवक कृष्णा वाघमारे, दत्ता ताड, नितीन ताड, अक्षय वाडकर,साहेबराव घोडके,आबा पवार, उमेश सर्वगोड भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब,भाजप प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष विश्वजीत विश्वजीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक जिल्हा, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन कौशल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत भारतीय जनता पार्टीचे संघटना वाढवणारा असून आपण ही जबाबदारी सर्वाना सोबत पार पाडणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमारे यांनी सांगितले.