रोजगार मेळाव्यातून अनेकांचे संसार उभा करू शकलो याचा मनस्वी आनंद - मा.आम.दिपकआबा साळुंखे

आबांच्या जन्मदिनी आयोजित रोजगार मेळाव्याला प्रचंड यश ; हजारो तरुणांच्या हाताला मिळाले काम

रोजगार मेळाव्यातून अनेकांचे संसार उभा करू शकलो याचा मनस्वी आनंद - मा.आम.दिपकआबा साळुंखे

रोजगार मेळाव्यातून अनेकांचे संसार उभा करू शकलो याचा मनस्वी आनंद - मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील

आबांच्या जन्मदिनी आयोजित रोजगार मेळाव्याला प्रचंड यश ; हजारो तरुणांच्या हाताला मिळाले काम

सांगोला - गेली अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करत असताना पक्ष पार्टी, जात-पात आणि राजकारण बाजूला ठेऊन नेहमीच मी तळागाळातील कार्यकर्त्यांचा प्राधान्याने विचार केला आणि समाजकारणाला महत्त्व दिले. वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्यातून सांगोला तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देत त्यांचे संसार उभा करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि ७ जानेवारी रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी देशातील नामांकित अशा "यशस्वी फाऊंडेशन" या संस्थेने पुढाकार घेतला होता. सांगोला तालुक्यात प्रथमच आयोजित रोजगार मेळावा प्रचंड हिट ठरला असून यामध्ये तब्बल ३ ते ४ हजार तरुणांनी आपली नाव नोंदणी केली होती. या मेळाव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सिरम इन्स्टिट्युट, फिनोलेक्स, महिंद्रा यासारख्या अन्य ३७ नामांकित कंपन्या समाविष्ट होत्या. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे पार पडलेल्या मेळाव्यात शैक्षणिक पात्रता पडताळून आणि मुलाखतीद्वारे निवड करून जागेवरच सुमारे ९५० तरुणांना आकर्षक पगारासह नामांकित कपन्यांनी नियुक्तीपत्र देऊन जागेवरच निवड केली. या निवडीमुळे हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते.

नियुक्तीपत्र प्रदान करताना मा.आमदार दिपकआबा म्हणाले, ग्रामीण भागात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आर्थिक विवंचना असताना शिक्षण घेऊनही तरुण तरुणींच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला होता हा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच कार्यकर्त्यांनी हा भव्य रोजगार मेळावा आयोजित केला या मेळाव्यातून ज्या तरुणांना नोकरी मिळाली त्यांनी आपल्या संस्थेत किंवा कंपनीत प्रामाणिक पणे काम करून आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपने पार पाडावी आणि ज्यांना नोंदणी करून मुलाखत देऊनही नोकरी मिळाली नाही त्यांनी अजिबात निराश होऊ नये मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपनीमध्ये जेंव्हा जेंव्हा जागा उपलब्ध होतील तेंव्हा प्राधान्याने तुमचा विचार केला जाईल असेही शेवटी मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.


चौकट - पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू 

शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने सांगोला तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत होता. अशा परिस्थितीत दिपकआबांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित मेळाव्यात ज्या तरुणांना नोकरी मिळाली त्यांच्या आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले या मुले-मुली आणि पालकांनी डोळ्यात आनंदाचे अश्रू घेऊनच माजी आमदार दिपकआबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हे चित्र अत्यंत भावनिक होते.