राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी महंमदगौस मुजावर यांची निवड.

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वतीने सत्कार संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी महंमदगौस मुजावर यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी महंमदगौस मुजावर यांची निवड.

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वतीने सत्कार संपन्न.

सांगोला - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नाम. अजितदादा पवार यांच्या शुभ आशीर्वादाने व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. नामदार प्रफुल्लभाई पटेल तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या निवडी करण्यात आल्या या निवडीमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षपदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून सर्वत्र प्रचलित असणाऱ्या सांगोल्याच्या मोहम्मदगौस मुजावर यांची निवड करण्यात आली.तसेच जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी अक्कलकोट नजीर भाई इनामदार मंगळवेढा यांच्याही निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष वसीम हाजी ख्वाजाभाई बुऱ्हाण यांच्या सहीचे नियुक्तीपत्र मुजावर यांना देण्यात आले.

या निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) मोहम्मदगौस मुजावर यांचे मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील शुभहस्ते यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दिपकआबा म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आम्ही पोहोचवत असून मी नेहमीच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत आलो आहे मोहम्मदगौस मुजावर हा माझा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता असून त्याच्यावर आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक विभागातील बांधवांच्या अडीअडचणी सोडवून जिल्ह्याभरात पक्ष बळकटी करण्याची जबाबदारी या निमित्ताने मुजावर यांच्यावर सोपवत आहे.

यापूर्वी सांगोला शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विचार अल्पसंख्याक समाजाच्या घराघरात पोहोचवण्याचे काम मोहम्मदगौस मुजावर यांनी केले आहे राजकीय तसेच सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये मुजावर यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून सध्या ते ज्ञानदीप विद्यालय सांगोला येथे शिक्षक म्हणून सेवा बजावत आहेत.

मोहम्मदगौस मुजावर यांच्या या निवडीमुळे करण्यात आलेल्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना ते म्हणाले की आज पावतो आमचे नेते दीपकआबा यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आलो आहे तसेच आगामी काळात देखील अल्पसंख्याक समाजासह विविध घटकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे अभिवचन या वेळी मोहम्मदगौस मुजावर यांनी यावेळी दिले.

या सत्कार समारंभ प्रसंगी माजी नगरसेवक जुबेर मुजावर, आलमगिर मुल्ला, अय्याजबाबा मणेरी, साहिल इनामदार, फारुक मुल्ला, समीर इनामदार, रियाज मुजावर, फिरोज मुलाणी, मिनाज खतीब,गिरीश पाटील ,मिनाज मुलाणी, माजी नगरसेवक अरुण काळे, ॲड. महादेव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.