होलार समाजाच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान 

आपला माणूस आमदार होणार; मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना दिला होलार समाजाने आशीर्वाद

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे होलार समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर-मंगळवेढा विधान सभा मतदार संघाचे उमेदवार, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी होलार समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी होलार समाज बांधवांच्या वतीने ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला.यावेळी होलार समाजाने आपला माणूस दिलीप बापू धोत्रे आमदार होणार असा आशीर्वाद दिला.

यावेळी दिलीप बापू धोत्रे यांनी होलार समाज बांधवांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न जाणून घेऊन लवकरच सोडवले जातील असा विश्वास देत समाजाच्या अडीअडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन दिलीप बाबू धोत्रे यांनी यावेळी केले.

यावेळी होलार समाजाचे प्रदेश अध्यक्ष रणजित ऐवळे, नेते हैदर केंगार, शिवाजी केंगार  शंकर ऐवळे, किसनराव भजनवले, रतिलाल केंगार, नानासाहेब हेगडे, मधुकर भंडगे, बाळासाहेब जावीर, पांडुरंग गेजगे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी हजारोच्या संख्येने होलार समाज बांधव, भगिनी उपस्थित होते.