आमदार राजू खरे यांची दैनंदिनी जाहीर होत असल्याने हेलापटे बंद 

वेळेच्या बचतीमुळे तीन तालुक्यांतील मतदारांकडून विशेष कौतुक

आमदार राजू खरे यांची दैनंदिनी जाहीर होत असल्याने हेलापटे बंद 

आमदार राजू खरे यांची दैनंदिनी जाहीर होत असल्याने हेलापटे बंद 

वेळेच्या बचतीमुळे तीन तालुक्यांतील मतदारांकडून विशेष कौतुक

पंढरपूर - मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार राजू खरे यानी आपल्या मतदार संघातील जनतेला आपल्याकडे येण्यासाठी विनाकारण हेलपाटे लागू नये. त्यामुळे विनाकारण वेळ वाया जाऊ नये. यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. त्या उपक्रमांमधून आपल्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत पर्यंतचे दिवसभरातील दैनंदिनी वेळापत्रक थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याची वेगळीच नव्याने प्रथा सुरू केली आहे. यामुळे मोहोळ मतदार संघात येत असलेल्या तीन तालुक्यातील समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या जनतेचा मार्ग सुलभ झाला आहे.

मोहोळ विधानसभा मतदार संघात मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला समावेश आहे. या मतदार संघात नव्याने आमदार म्हणून राजू खरे निवडून आले आहेत. ते पंढरपूरचे रहिवासी असल्याने स्थानिक आमदार म्हणून त्यांचेकडे मतदार यांनी पाहिले आहे. आ. राजू खरे यांचे पंढरपूर तालुक्यात गोपाळपूर येथे त्यांचे मोठ फार्महाऊस आहेः. विशेषतः त्याच भागापासून मोहोळ विधानसभा मतदार संघ सुरू होत आहे. त्यामूळे या मोहोळ मतदार संघातील जनतेला संपर्क साधण्यासाठी हक्काचा स्थानिक आमदार मिळाला आहे. या नावाने निवडून आलेल्या आ. राजू खरे यांनी वरील तीनही तालुक्यातील लोकांना आपल्याशी भेटतांना हेलपाटे होत वेळ वाया जावू नये.यासाठीच आमदार खरे यांनी आपला दिवसभरातील दौरा सोशल मीडियावर सोडण्याचां नवीन पायंडा सुरू केला आहे.

यामुळे आमदार खरे यांचं ठावठिकाणा माहिती होऊन भेटायला जावून आपल्या समस्या मांडणे अधिकचे सुलभ वाटू लागले आहे. यामुळे एक मतदार संघातील विकासकामे आणि वयक्तिक गाठीभेटीसाठी शिस्त लागल्याचे दिसून येऊ लागली आहे.

स्थानिक आमदार असल्याने जनता खूष

मोहोळ विधानसभा मतदार संघात मागील पंधरा वर्षापासून आमदार हे बाहेरच्या भागात राहत असलेले होते. यामुळे त्यांचा सहवास लाभणे मुश्किलचे होते. आठवड्यातून एकदा भेटीचा जो दिवस असायचा त्यालाही बहुतांश वेळी कार्यक्रम असल्यानं कात्री लागत होती. त्यामूळे मतदार संघांतील लोकांना झटपट भेटण्यासाठी मोठी पंचायत होत होती.आताचे हे आ.राजू खरे यांचे फिक्स ठिकाण मतदार संघातच आहे. याठिकाणी फार्महाऊस वरती आल्यावरही लोकांना हेलपाटे होवु नये म्हणूनच या ठिकाणी कोणत्या वेळेस भेटणे श्यक आहे. त्याची पूरेपूर सोशल मीडियावर माहिती सोडण्याचे काम स्विय सहाय्यक मोहन देडे यांचे मार्फत सुरु असल्याने आमदार आणि जनता यामधील अतूट नाते घट्ट बनत चालले आहे.