आदर्श शिक्षक पुरस्काराने राजेंद्र पाराध्ये तर देविदास कसबे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
आदर्श शिक्षक पुरस्काराने राजेंद्र पाराध्ये तर देविदास कसबे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
पंढरपूर - कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नांदेड आयोजित तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन सोलापूर येथे संपन्न.सदरील साहित्य संमेलनामध्ये पंढरपूर येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये सर यांना आदर्श शिक्षक तर जनसेवक देविदास कसबे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

या राज्या अधिवेशनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करून साहित्य संमेलनाचे दीपप्रज्वलन डॉ. माधव गादेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर पुरस्काराचे वितरण संस्थेचे संस्थापक अँड बी.आर कळवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस ,कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अशोक पाटील, डॉक्टर लक्ष्मण कार्लेकर,सोलापूरच्या माजी महापौर नलिनी चंदिले ,माजी महापौर मनोहर सपाटे, दैनिक पुण्यनगरीचे सोलापूर उपसंपादक भरतकुमार मोरे ,विजयकुमार कांबळे व विविध भागातून आलेले साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेले 40 वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन विवेक वर्धनी विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र पारध्ये यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार देण्यात आला तर गेली 25 वर्षे सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन जनसेवक देविदास कसबे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.या दोन्ही पुरस्कारार्थींचे पंढरपुर आणि परिसरात मोठे कौतुक होत आहे.