प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक वाटचालीवर चर्चा
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
राष्ट्रवादी’च्या संघटनात्मक वाटचालीवर चर्चा
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी नागेश फाटे व उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान पक्षाची संघटनात्मक बांधणी, आगामी काळातील पक्षाची वाटचाल तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाची भूमिका आणि संघटन मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या भेटीमुळे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आमदार अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, प्रदेश महिला कमिटीच्या कविता मेहेत्रे, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष साहेबराव भुसे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष संजय शिंदे, नवनाथ बचुटे, भास्कर गायकवाड, बाळासाहेब देशमुख, संजय पवार, गोरख नाना बागल, अरुण पाटील, पंचायत समिती सदस्य सायली बंगाळे, रूपाली पवार, डॉ. रमेश फाटे, शुभम फाटे, शर्विन फाटे, संग्राम कापसे, विनय शिंदे, तेजस देवकते, सुमित बागल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.