मोहोळ तालुक्यामध्ये अत्याधुनिक भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार - उद्योजक राजू खरे
कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ २०२३ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
मोहोळ तालुक्यामध्ये अत्याधुनिक भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार - उद्योजक राजू खरे
कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ २०२३ भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
उद्योजक राजू खरे यांनी दिले ७१ हजाराचे पाहिले बक्षीस
पंढरपूर - मौजे-कुरूल ता.मोहोळ येथे कै.विष्णु बाबु धोत्रे यांच्या स्मरणार्थ १७/१२/२०२३ भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य निकाली कुस्तीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक मा.श्री.राजु खरे यांच्या तर्फे ७१००० हजार रूपयांचे पारितोषिक लावण्यात आले. सदर स्पर्धाची कुस्ती उद्योजक मा.श्री.राजु खरे यांच्या मार्फत लावण्यात आली.सदर कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मा.श्री.राजु खरे साहेब यांचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला.

यावेळी मोहोळ मतदार संघात अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी नेत्यांसह सामान्य नागरिक थेट उद्योजक राजाभाऊ खरे यांची भेट घेऊन कामे पूर्ण करण्याची मागणी करत आहेत.अवघ्या काही दिवसातच उद्योजक राजाभाऊ खरे यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदासभाई कदम, शिंदे गटाचे प्रमुख आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेली कामे खरे यांच्या माध्यमातून सहज मार्गी लागत असल्याने ते मोहोळ मतदार संघातील नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याने नागरिकांमधूनच आता मतदार संघाचे नेतृत्व राजाभाऊ खरे यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष न.प.पंढरपुर मा.वामन(तात्या) बंदपट्टे,वस्ताद पै.बाळासाहेब चवरे,मोहोळ विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख मा.प्रकाश(दादा)पारवे,बेगमपुर सरपंच मा.प्रकाश सपाटे,युवा नेते मा.गणेश जाधव,मा.रंगनाथ गुरव,उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख मा.उमाकांत करंडे,मोहोळ तालुका उपप्रमुख मा.अमर सोनवले,मा.चंदनशिवे सर,मा.लखन वाघमारे,मा.निखील गायकवाड,मा.आतिश सावंत,मा.नोमिनाथ शिरसट व समस्त कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.