कोर्टी येथे रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ ; सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख तथा डीपीडीसी सदस्य महेश साठे यांच्या हस्ते
सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख तथा डीपीडीसी सदस्य महेश साठे यांच्या हस्ते
कोर्टी येथे रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ
सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख तथा डीपीडीसी सदस्य महेश साठे यांच्या हस्ते

पंढरपूर - कोर्टी (ता. पंढरपूर) येथील मुसलमान येडगे वस्ती ते जुम्मा शेख वस्ती तसेच येडगे मुसलमान वस्ती ते लायकाल्ली शेख वस्ती या ठिकाणच्या दोन रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख तथा डीपीडीसी सदस्य महेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या ठिकाणी जवळपास ४०० ते ५०० लोकांची वस्ती आहे. त्यांची गेली कित्येक वर्षांची होणारी गैरसोय हा रस्ता झाल्यामुळे थांबणार आहे. या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून डीपीडीसी सदस्य तथा सोलापूर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख महेश साठे यांनी या दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये त्यांच्या निधीतून दिले.

विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांमध्ये महेश साठे यांनी टाकळी, कोर्टी, गादेगाव,बोहाळी, उंबरगाव,सोनके,तपकिरी शेटफळ या गावांना विकास निधी देण्याची भूमिका अग्रक्रमाने घेतल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या गावांतील नागरिकांकडून महेश साठे यांच्या माध्यमातून आशेचा किरण दिसत आहे.या रस्त्यांचे भूमिपूजन महेश साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
या भूमिपूजनप्रसंगी कोर्टी गावाचे सरपंच राजा पवार, सदस्य महेश येडगे, बबलू शेख, शरीफ शेख, इस्माईल शेख, असलम शेख, विजय काळे, हारून मुजावर, अनवर मुजावर, सोहेल मुजावर, महमूद शेख, राजा शेख उपस्थित होते.