"विठूरायाच्या भाविक भक्ताना पंढरपूर नगरपालिकाचे नम्र आवाहन" -  मुख्याधिकारी महेश रोकडे

"विठूरायाच्या भाविक भक्ताना पंढरपूर नगरपालिकाचे नम्र आवाहन" -  मुख्याधिकारी महेश रोकडे

"विठूरायाच्या भाविक भक्ताना पंढरपूर नगरपालिकाचे नम्र आवाहन" -  मुख्याधिकारी महेश रोकडे

पंढरपूर - आषाढी वारी - विठूरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली वैकुठ नगर तीर्थक्षेत्र पंढरपूर या शहरात आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने येणार्या भाविक भक्ताचे पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत...पंढरपूर - वारकरी भाविकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपालिके कडून नम्र आवाहन करण्यात येत आहे.

भाविकानी आपला मुक्काम व राहण्याची सोय 65 एकर या परिसरामध्ये करण्यात आली आहे.कुणीही भाविकानी शहरातील धोकादायक घरे,मठ,इमारती मध्ये राहू नये,मुक्काम करु नये.

उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये.शीळे अन्न खाऊ नये.बोरवेलचे पाणी पिऊ नये.नगरपालिकेने भाविकासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सर्वत्र केली आहे.
भाविकानी कचरा घन कचरा,ओला कचरा हा घंटा गाडी मध्ये टाकावा.उघड्यावर कचरा टाकू नये.

प्लस्टिक चा वापर करु नये तसेच शौचास उघड्यावर बसू नये नगरपालिकेने सुलभ शौचालय ठिकठिकाणी केले आहेत.त्याचा वापर करावा.किवा घरे,मठ याठिकाणी असलेल्या शौचालयाचा वापर करावा.

एकादी अनुचित घटना घडल्यास तसेच संशयास्पद वस्तू किवा व्यकती आढळल्यास प्रशासनाला कळवणे.पोलीस आपल्या मदतीला ठिकठिकाणी आहेत.

एकदा भाविक आजारी पडला किवा अपघात झाल्यास शहरातील विविध भागात वैद्यकिय उपचार केद्र उभारली असून त्या ठिकाणी उपचार घ्यावा.भाविकानी आपली वाहने शहरातील विविध ठिकाणी वाहनतळ केली आहेत.तेथे आपली वाहने लावावी.अबाबाई पंटागण,65 एकर,इसबावी विसावा,गजाननमहाराज मठा मागे,कराडरोड,अशा विविध ठिकाणी असलेल्या वाहनतळावर वाहने लावावीत.असे नम्र आवाहन भाविकाना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.