उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांची आग्रही मागणी
पंढरपूर एमआयडीसी तात्काळ सुरु करण्याची मागणी
पंढरपूर एमआयडीसी तात्काळ सुरु करण्याची मागणी
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांची आग्रही मागणी
पंढरपूर - पंढरपूर एमआयडीसी तात्काळ कार्यान्वित करण्याची तसेच मंगळवेढा येथील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग उभारण्यात यावेत अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांनी केली आहे.

उद्योगमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की , पंढरपूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या एमआयडीसी मध्ये उद्योग उभारणी करून सदर एमआयडीसी तात्काळ कार्यान्वित करणे अत्यंत गरजेचे आहे. पंढरपुरात तयार होणारे चुरमुरे, बत्तासे, कुंकू, बुक्का, फोटो फ्रेम, दगडी मूर्ती, खेळणी, बांगडी असे उद्योग एमआयडीसी मध्ये उभारण्यासाठी चालना द्यावी.

एमआयडीसी सुरू झाल्यास पंढरपूर परिसरातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची यावी तसेच मंगळवेढा तालुक्यातील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू व्हावेत. मंगळवेढा तालुका हा कायम दुष्काळग्रस्त तालुका असून तेथे रोजगाराच्या संधी अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या भागात नवीन उद्योग उभारले गेल्यास तालुक्याची बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग व्यवसायाची उभारणी करून या भागातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा शिवसेनेचे नेते अनिल सावंत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.