अवकाळीची मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी..उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी
अवकाळीची मदत तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी..
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे चेअरमन कल्याणराव काळे यांची मागणी
पंढरपूर - गेल्या आठ दिवसापासून पंढरपूर तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनास पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात म्हणावा तसा पाऊस पडला नसल्याने शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली.

मात्र गेल्या आठ दिवसापासून पंढरपूर तालुक्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे डाळिंब, केळी, आंबा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला.
याची दखल घेऊन सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली व नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत,अशी मागणी केली.
यास उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकन्यातून समाधान व्यक्त होत आहे.